Followers

Wednesday, January 18, 2023

मत्ता व दायित्त्वे

मत्ता व दायित्त्वे

१. मत्ता व दायित्त्वे कोणी सादर करावयाचे आहे?

प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने (वर्ग ४ मधील कर्मचारी वगळता)त्याचे मत्ता व दायित्त्वे याबाबतचे विवरण सादर करावेआयचे आहे.

२. मत्ता व दायित्त्वे केव्हा सादर करावयाचे आहे?

शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग वशिअ-१२१४/प्र.क्र. २६/११, दि.२/६/२०१४ अन्वये प्रत्येक शासकीय अधिकारी/ कर्मचारी (गट ड मधील कर्मचारी वगळून) यांनी त्याच्या मालमत्तेचे विवरण दरवर्षी सादर करणे आवश्यक आहे. दि. ३१ मार्च २०१४ च्या स्थितीस अनुसरून दि. ३० जून २०१८ पूर्वी व त्यानंतर प्रत्येक वर्षी ३१ मार्चच्या स्थितीत अनुसरुन मालमत्तेचे विवरणपत्र विहीत नमुन्यात त्या वर्षाच्या दि. ३१ मे पूर्वी सादर करणे बंधनकारक आहे.

३. मत्ता व दायित्त्वे सादर करणे का महत्त्वाचे आणि आवश्यक आहे?

प्रत्येक शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी त्या त्या वर्षाची वार्षिक मालमत्ता विवरणपत्रे सादर केली असणे, ही सर्व टप्यावरील पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना अंतर्गत पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दोरा यासाठी पूर्वअट म्हणून विहीत करण्यात आलेली आहे.

४. मत्ता व दायित्त्वे संबंधित शासन निर्णय

सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय १५-०७-१९८६, २४-११-१९८८, ०९-०१-२००२ आणि २१-०२-२००९

गोपनीय अहवाल लिहिण्याचे आणि सादर करण्याचे वेळापत्रक

गोपनीय अहवाल लिहिण्याचे आणि सादर करण्याचे वेळापत्रक


गोपनीय अहवालाचे कोरे नमुने देणे

प्रत्येक वर्षी १ एप्रिल या दिवशी सर्व आस्थापना अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांना त्यांच्या गोपनीय अहवालाचे कोरे नमुने (PAR/CR) पत्राद्वारे अथवा हस्तबटवडयाने पोहोचवून द्यावेत.

स्वयंमूल्य निर्धारण अहवाल कसे लिहावेत?

संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी सदर गोपनीय अहवालाच्या नमुन्यामध्ये त्यांचे त्या कालावधीतील स्वयंमूल्यनिर्धारण अहवालात फक्त ठळक वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कामगिरीचा उल्लेख करावा. संदिग्ध विधाने टाळावीत व नेमके विधान करावे. कामगिरीबाबतचे अभिप्राय दिलेल्या जागेएवढेच मर्यादित ठेवावेत. काहीही सहपत्रे त्यासोबत जोडण्यात येऊ नयेत. स्वयंमूल्यनिर्धारण अहवाल परिशिष्ट-ब (भाग-३) मध्ये अर्ध्या पानातच लिहावा.

स्वयंमूल्य निर्धारण अहवाल सादर करण्याची मुदत

असे स्वयंमूल्यांकन भरलेले गोपनीय अहवाल संबंधित अधिकारी/कर्मचारी यांनी त्यांच्या प्रतिवेदन अधिकाऱ्यांकडे १५ एप्रिल २०१६ पर्यंत  सादर करावेत.

प्रतिवेदन अधिकाऱ्याने गोपनीय अहवाल लिहून सादर करण्याची मुदत

प्रतिवेदन अधिकारी यांनी परिशिष्ट ब (भाग-४) लिहून पुनर्विलोकन अधिकाऱ्यांकडे ३० एप्रिल २०१६ पर्यंत सादर करावेत.

पुनर्विलोकन अधिकाऱ्याने गोपनीय अहवालाचे पुनर्विलोकन करून संस्करण अधिकाऱ्याकडे सादर करण्याची मुदत

पुनर्विलोकन अधिकान्यांनी परिशिष्ट ब (भाग-५) पूर्ण करुन गोपनीय अहवाल संस्करणासाठी, संस्करण

अधिकाऱ्यांकडे दि. १५ मे २०१६ पर्यंत सादर करावेत.

संबंधित शासन निर्णय

१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. सीएफआर-१२१०/प्र.क्र.४७/२०१०/तेरा.दि.०१/११/२०११

२. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्र. सीएफआर-१२११/प्र.क्र.२१७ /तेरादि.१७ डिसेंबर २०११