Followers

Sunday, September 10, 2017

उत्तर कोरियाचा हुकूमशहा ठरला भारतासाठी इष्टापत्ती!

उत्तर कोरियात आणि पाकिस्तानात हुकूमशाही प्रवृत्तीचे राज्यकर्ते राज्य करतात. या दोन्ही देशांतील राज्यकर्त्यांचा कळसूत्री बाहुल्यांसारखा वापर करण्याचे धोरण चिनी राज्यकर्ते राबवित आले आहेत. पाकिस्तानचा वापर भारताविरुद्ध आणि उत्तर कोरियाचा वापर जपानविरुद्ध! पण उत्तर कोरियाच्या हुकूमशहाने आता चीनलाही न जुमानता आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी करतांना ही क्षेपणास्त्रे जपानच्या अवकाशातून आरपार डागली आणि आता चीनचे डोळे खाडकन उघडले! उद्या पाकिस्तानातील राज्यकर्तेही उत्तर कोरियाच्या हुकूमशहासारखे वागतील, याची चिनी राज्यकर्त्यांना जाणीव झाली आणि म्हणूनच चीनने ब्रिक्स परिषदेत पाकिस्तानविरुद्ध भूमिका घेतली. (चीनची ही 180 अंशाच्या कोनातून बदललेली भूमिका म्हणजे भक्तांना  त्यांच्या नेत्यांच्या मुत्सद्देगिरीचा परिपाक वाटणे, हे त्यांच्या अंधभक्तीला साजेसेच आहे.) पण उत्तर कोरियाच्या हुकूमशहाची भांडखोर व युद्धखोर खुमखुमी भारतासाठी इष्टापत्ती ठरली, ही आपल्यासाठी सकारात्मक बाब आहे.

Friday, August 4, 2017

ताळेबंद म्हणजे काय?

ताळेबंद म्हणजे काय?

        कोणत्याही व्यवसायात स्वतःच्या मालकीचा निधी (स्वनिधि) आणि गरज पडल्यास कर्ज (देयता) घेऊन व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक मालमत्ता खरेदी करण्यात येते. म्हणून मालमत्ता म्हणजे देयता अधिक स्वनिधी. हेच ताळेबंदाचे सूत्र (Balance Sheet Equation) आहे. ताळेबंद समजून घेण्यासाठी हे सूत्र उपयुक्त अत्यंत आहे.

        स्वनिधीला नक्त मूल्य (Net worth किंवा Owners' Equity) असेही म्हटले जाते. हे सूत्र Asset=Net worth+Liabilities असेही मांडता येते. स्वनिधीमध्ये भागभांडवल, मुक्त निधी आणि संचित नफ्याचा समावेश होतो.

       स्वनिधी, देयता आणि मालमत्ता (Owners' Equity, Liabilities and Assets) हे ताळेबंदाचे तीन मुख्य घटक आहेत. यापैकी कोणत्याही घटकात बदल झाला तर संस्थेच्या आर्थिक स्थितीत बदल होतो. परिणामी, ताळेबंदात बदल होतो. संस्थेत दररोज असंख्य आर्थिक व्यवहार (financial transactions) अव्याहतपणे होतात. प्रत्येक आर्थिक व्यवहाराचा वरील तीन घटकांपैकी एका घटकावर परिणाम होतोच. खर्चात किंवा उत्पन्नात बदल झाला की नफा/तोटा बदलून स्वनिधीत बदल होतो. येणे रकमेत बदल झाला की, मालमत्तेत (assets) बदल होतो. देणे रकमेत बदल झाला की देयता (liabilities) मध्ये बदल होतो. अशा प्रकारे प्रत्येक आर्थिक व्यवहारामुळे संस्थेच्या आर्थिक स्थितीत बदल होत असतो. त्यामुळे ताळेबंद हा संस्थेच्या या आर्थिक स्थितीचे त्या विशिष्ट क्षणाचे (at a specific point in time) क्षणचित्र (snapshot) असतो.

        आपण जेव्हा 31 मार्च रोजीचा ताळेबंद म्हणतो तेव्हा 31 मार्च रोजी शेवटचा आर्थिक व्यवहार झाला त्या क्षणाचा तो ताळेबंद असतो. त्या दिवशी सकाळचा ताळेबंद वेगळा असतो, दुपारचा वेगळा असू शकतो. संस्थेच्या आर्थिक वाटचालीची आपण एखाद्या प्रवासी बससोबत तुलना केली तर ताळेबंद म्हणजे अशा बसचा कोणत्याही क्षणी  (गतिमान स्थितीतला आणि थांबलेल्या अवस्थेतही) फोटो आहे!

Sunday, May 28, 2017

MMTC चे shares खरेदी करावेत का?

MMTC ही भारत सरकारने 1963 साली स्थापन केलेली कंपनी असून तिचे पूर्ण नाव Metals and Minerals Trading Corporation of India असे आहे। धातू आणि खनिजांचा जगभरात व्यापार करणारी सार्वजनिक क्षेत्रातील ही दोन क्रमांकाची मोठी कंपनी आहे। 

मागील काही वर्षांपासून या कंपनीची आर्थिक वाटचाल पाहू या। (सर्व अंक रु. कोटीत)
Cash Flow
वर्ष            उपलब्ध कॅश
2012        2853.12
2013        1475.05
2014          528.67
2015          163.77
20167            8.45
वरिल आकडेवारी वरून हे स्पष्ट दिसून येते की, कंपनीकडे उपलब्ध कॅश वरचेवर कमी कमी होत आहे.

उत्पन्न आणि नफा
वर्ष            एकूण उत्पन्न     निव्वळ नफा      निव्वळ नफा%
2012           67,051.9               70.72                            0.10
2013          28916.26       -70.62                 -0.24
2014          25491.85        18.64                  0.07
2015          18409.27        47.91                  0.26
2016          12655.65       54.86                  0.43  
नफ्याचे प्रमाण किमान 8% तरी असावे. पण या कंपनीचा जास्तीत जास्त नफा 0.43% आहे, 2013 या वर्षी तर तोट्यात आहे.

Return on Networth/Equity
वर्ष           Networth।           RoE%
2012         1421.40                4.52
2013          1340.78.              -4.62
2014         1341.87.                1.21
2015         1359.20.                3.06
2016.         1377.95.              3.98
Networth  सातत्याने वाढले पाहिजे. पण इथे तर  ते 2012 च्या तुलनेत 2016 मध्ये कमी झाले आहे. RoE चे प्रमाण कमीत कमी 15% असावे. इथे ते जास्तीत जास्त 4.52% आहे, आणि तेही 2012 मध्ये! 2013 मध्ये तर ते nagative आहे. 2012 मध्ये ते 2016 च्या तुलनेत अजून कमी झाले आहे.

Mutual Funds चा सहभाग
मागील दीड वर्षांत एकाही Mutual Fund ने या कंपनी च्या स्टॉक ची खरेदी केलेली नाही.

सरकारचा हस्तक्षेप
ही सरकारी कंपनी असल्यामुळे सरकारी हस्तक्षेपास, भ्रष्टाचारास व गैर व्यवस्थापनास इथे भरपूर वाव आहे.

आता या कंपनीचे shares खरेदी करावे की नाही, याचा निर्णय घेणे आपल्या हातात आहे!

Tuesday, February 21, 2017

Shares बाय बॅक का आणि केव्हा?


       चांगल्या कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमावतात. या मोठ्या नफ्याचा मोठा भाग व्यवसायविस्तारासाठी पुन्हा व्यवसायात गुंतवितात  आणि/किंवा  भागधारकांना डिव्हिडंड देतात. पण कंपनीने अशा प्रकारे नफा वापरला नाही तर मात्र ही रक्कम अनुत्पादक स्वरूपात तशीच पडून राहते.  
           कंपनीची कामगिरी चांगली  असूनही शेअरची बाजारातील किंमत वाढत नसेल तर भागधारक अस्वस्थ होतात आणि कंपनीकडे मोठ्या प्रमाणात पडून असलेल्या रोख रकमेमूळे संचालक मंडळाच्या कामकाजावर टीका होते. भागधारकांच्या भांडवलामुळेच हा नफा कमावला असल्यामुळे ही पडून राहिलेली रक्कम भाग धारकांना परत करण्यासाठी dividend देणे किंवा share buyback हे दोन पर्याय उपलब्ध असतात. 
            Share buyback या पर्यायात कंपनी भागधारकांकडील Outstanding Shares खरेदी करते. अशी खरेदी 3 पद्धतीने करता येते.
1. चालू बाजार भावाने
2. ठराविक दराने (Tender Offer). हा ठराविक दर हमखास चालू बाजार भावापेक्षा जास्त असणार, हे स्पष्ट आहे.
3. वाटाघाटी करून(Negotiations)

Shares Buy backचे खालील परिणाम संभवतात-
1. Tender Offer बाजार भावापेक्षा जास्त असल्यामुळे अतिरिक्त कॅश भागधारकांना वाटप होते व त्यांचा फायदा होतो.
2.Outstanding Shares ची संख्या कमी झाल्यामुळे EPS मध्ये वाढ दिसून येते.
3.Outstanding Shares ची संख्या कमी झाल्यामुळे बाजारात त्या कंपनीच्या shares पुरवठा कमी होतो आणि मागणी-पुरवठा नियमा नुसार Share च्या बाजार भावात वाढ होण्याची शक्यता वाढते.
4. कंपनीकडील shares ची संख्या वाढल्यामुळे take over चा धोका कमी होतो व विद्यमान संचालक मंडळाचे नियंत्रण आणखी घट्ट होते.
5. स्वतःचे under valued Shares ची खरेदी केल्याने कंपनीचा भविष्यातील स्वतःच्या  उज्ज्वल कामगिरीवर विश्वास दिसून येतो.

TCS च्या बाबतीत
दि. 20 फेब्रुवारी 2017 रोजी TCS ने buy back ची घोषणा केली. Tender offer चा दर रु 2850 ठेवला आहे. त्या दिवशी TCS चा बाजार भाव रु 2400 होता। TCS कडे रु. 43,000 कोटी पेक्षा जास्त cash पडून आहे, तर Infosys कडे 35,700 कोटी रुपये पडून आहेत!

Havells आणि Lloyd Electric मधील 1600 कोटीची Deal


        सध्या Lloyd electric ची आर्थिक स्थिति फार चांगली नाही. कर्ज जास्त (रु.816.93 कोटी) आहे आणि निव्वळ नफ्याचे प्रमाण कमी (2.35%) आहे. 

      याउलट Havells ची आर्थिक स्थिति चांगली आहे. ही कर्जमुक्त कंपनी आहे आणि नफ्याचे प्रमाण 13.15% आहे.

      Havells ही कंपनी Lloyd च्या 6 business divisions पैकी फक्त एक division (Consumer Durable Goods) खरेदी करणार आहे.

      कर्ज कमी करण्यासाठी Lloyd तिचा हा सर्वात जास्त फायदेशीर असलेला business विकणार आहे, तर Havells ला त्यांच्या सध्याच्या business मध्ये हा नवीन business वाढवायचा आहे व त्यासाठी Lloyd चे brand name वापरायचे आहे.  

       Lloyd आणि havells मध्ये होणाऱ्या डीलमुळे Lloyd वर काय परिणाम ( चांगला किंवा वाईट) परिणाम होईल, हे आज निश्चितपणे सांगता येणार नाही, पण Havells चा नक्कीच फायदा होण्याची जास्त शक्यता आहे.

       या Deal चा परिणाम म्हणून आज Havells चा शेअर 2.66% उतरला, तर Lloyd Electric चा शेअर तब्बल 16.75% उतरला!

Sunday, February 19, 2017

Sunil High-techच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी काय?

Eicher motors ही अत्यंत चांगली कंपनी समजली जाते। त्यामुळे मी Sunil Hightech ची तुलना Eicher motors बरोबर केली आहे। Stock Investment करतांना खालील points महत्त्वाचे आहेत- (March 2016 च्या Financial Statements नुसार)
1. Sunil Hightech - Promotors चे 54% शेअर्स कर्जापोटी गहाण आहेत। (Eicher-एकही share गहाण नाही)

2.    Sunil Hightech  नेट प्रॉफिट फक्त 2.63% आहे। मागील 5 वर्षांत सर्वात जास्त म्हणजे 2.8% सन 2012 मध्ये होता। (Eicher-19.87%)

3.  Sunil Hightech-  Return on Networth फक्त 11.62% आहे। (Eicher motors 57.18%)

4.    Sunil Hightech-  Debt/Equity रेश्यो 0.98 आहे।  म्हणजे कर्जबाजारी कंपनी आहे। व्याजपूर्व नफा रु 91.73/शेयर आहे। त्यापैकी 49.52 रु व्याज भरावे लागते। (Eicher motors 0.01%. रु 652.06 पैकी फ़क्त 52 पैसे व्याज भरते)

5.    Sunil Hightech-  एकाही mutual fund ने या कंपनीचा शेयर त्यांच्या portfolio साठी खरेदी केला नाही। (Eicher- 179 Mutual फंडाच्या पोर्टफोलियोमध्ये आहे)


आता  निर्णय घेणे तुमच्या हाती!