MMTC ही भारत सरकारने 1963 साली स्थापन केलेली कंपनी असून तिचे पूर्ण नाव Metals and Minerals Trading Corporation of India असे आहे। धातू आणि खनिजांचा जगभरात व्यापार करणारी सार्वजनिक क्षेत्रातील ही दोन क्रमांकाची मोठी कंपनी आहे।
मागील काही वर्षांपासून या कंपनीची आर्थिक वाटचाल पाहू या। (सर्व अंक रु. कोटीत)
Cash Flow
वर्ष उपलब्ध कॅश
2012 2853.12
2013 1475.05
2014 528.67
2015 163.77
20167 8.45
वरिल आकडेवारी वरून हे स्पष्ट दिसून येते की, कंपनीकडे उपलब्ध कॅश वरचेवर कमी कमी होत आहे.
उत्पन्न आणि नफा
वर्ष एकूण उत्पन्न निव्वळ नफा निव्वळ नफा%
2012 67,051.9 70.72 0.10
2013 28916.26 -70.62 -0.24
2014 25491.85 18.64 0.07
2015 18409.27 47.91 0.26
2016 12655.65 54.86 0.43
नफ्याचे प्रमाण किमान 8% तरी असावे. पण या कंपनीचा जास्तीत जास्त नफा 0.43% आहे, 2013 या वर्षी तर तोट्यात आहे.
Return on Networth/Equity
वर्ष Networth। RoE%
2012 1421.40 4.52
2013 1340.78. -4.62
2014 1341.87. 1.21
2015 1359.20. 3.06
2016. 1377.95. 3.98
Networth सातत्याने वाढले पाहिजे. पण इथे तर ते 2012 च्या तुलनेत 2016 मध्ये कमी झाले आहे. RoE चे प्रमाण कमीत कमी 15% असावे. इथे ते जास्तीत जास्त 4.52% आहे, आणि तेही 2012 मध्ये! 2013 मध्ये तर ते nagative आहे. 2012 मध्ये ते 2016 च्या तुलनेत अजून कमी झाले आहे.
Mutual Funds चा सहभाग
मागील दीड वर्षांत एकाही Mutual Fund ने या कंपनी च्या स्टॉक ची खरेदी केलेली नाही.
सरकारचा हस्तक्षेप
ही सरकारी कंपनी असल्यामुळे सरकारी हस्तक्षेपास, भ्रष्टाचारास व गैर व्यवस्थापनास इथे भरपूर वाव आहे.
आता या कंपनीचे shares खरेदी करावे की नाही, याचा निर्णय घेणे आपल्या हातात आहे!
No comments:
Post a Comment